HW News Marathi
देश / विदेश

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली | निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या तिघांना फाशीची शिक्षा कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांची शिक्षा शिथील होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय, पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. तर या प्रकरणातील चौथा दोषी अक्षयने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नव्हती.

निर्भया प्रकरणात उच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकिल एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 15 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत 5 मे 2017 रोजी फाशीवर स्थगिती आणली होती. सहा आरोपींपैकी एक राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर सहावा आरोपी अल्पवयीने असल्याने त्याला तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनिष -सिंहराज जोडीचा पराक्रम, गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची केली कमाई!

News Desk

शेतकरी आत्महत्येवर झटपट उपाय अशक्य-सर्वोच्च न्यायालय

News Desk

मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या टी. राजा सिंह यांचे भाजपकडून निलंबन

Aprna