HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

पायी प्रवास करत मंजूर घराकडे निघाले अन् कोरोना महामारीचे चित्र बनले !

मुंबई | देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारन २० लाख कोटींच पॅकेज जाहीर केले. कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (२२ मे) पार पडली. लॉकाडऊन घोषणेनंतर स्थलांतरित मंजूर हे त्यांच्या मुलांना घेऊन  शेकडो किलोमीटर पायीपीठ करत घराकडे जाताना दिसले. मात्र, या स्थलांतरित मंजूरकडे पैसे आणि जेवण नाही, अशी अस्वस्थता हेच सध्याचे कोरोना महामारीचे चित्र बनले आहे, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिा गांधी म्हणाल्या. या बैठकीत सोनिया गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली.

 गेल्या सात तिमाहींमध्ये जीडीपी सातत्याने घसरतोय हे त्याचेच लक्षण आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधींनी बैठकीत म्हणाल्या.  सोनिया गांधींच्या नेतृत्वात देशातल्या २२ पक्षांनी यात सहभाग घेतला. त्यातही सर्वात लक्षणीय उपस्थिती होती शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत बैठकीला हजर होते. तसेच माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम के स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपले मत मांडले केले.

 

Related posts

#CoronaVirus | आता शहरांतील झोपडपट्टी परिसरांतही ‘कोरोना’चा शिरकाव

News Desk

उद्या मोदींनी भाजपच्या प्रचारात ट्रम्प, पुतीन यांना उतरवले तर चालेल काय ? 

News Desk

अब्दुल सत्तार गद्दार, चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

News Desk