HW News Marathi
देश / विदेश

आग्रा शहराचे नाव बदलण्याची मागणी

लखनऊ। उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद आणि फैजाबादनंतर आता आग्रा शहराचे नाव बदलण्याची मागणी भाजप नेत्यांनीकडून केली आहे. “आग्रा शहराला अग्रवाल किंवा अग्रवन हे नाव द्यावे”, असे भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी म्हटले आहे. ‘आग्रा’ या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही. आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व देखील नाही. यापूर्वी या ठिकाणी जंगलं होती आणि अग्रवाल समाज या भागात राहत होता. अग्रवालांचा मोठा वारसा असलेल्या शहराला त्यांचं नाव देण्यात यावं”, असे गर्ग यांनी म्हटले आहे.

याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचे प्रयागराज तर फैजाबादचे नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती. आता जगप्रसिद्ध आगऱ्याचे नाव बदलण्याची मागणी योगींकडे स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. आगऱ्याचे अग्रवाल किंवा अग्रवन असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी स्थानिक भाजप नेत्यांनी योगींना पत्र लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी-पवार भेटीबाबत अफवा पसरवण्याचं काम, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

शेतकऱ्यांचा ऐलान, ६ फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम!

News Desk

काँग्रेसला दूर ठेवून नवीन आघाडी होणे शक्य नाही! – संजय राऊत

News Desk