HW News Marathi
देश / विदेश

१५ कोटी वर्षापूर्वीचे डायनासॉरचे आवशेष सापडले

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): तब्बल १५ कोटी वर्षांपूर्वीचा जीवाश्म भारतात सापडला असून, त्यामुळे संशोधकांना एक मोठा संदर्भ हाती लागला आहे. गुजरातमधील कच्छमध्ये भारतीय आणि जर्मन वैज्ञानिकांना हे अवशेष सापडले असून हा अतिशय मोठा शोध आहे असे म्हणावे लागेल.

या जीवाश्माची लांबी ५.५ मीटर इतकी मोठी असून, त्यामुळे विशिष्ट उपखंडात कशा पद्धतीचे जीव होते, त्यांच्याबाबतची इतरही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वैज्ञानिकांची टीम कच्छमध्ये आपले नियमित संशोधनाचे काम करत असताना त्यांना हे अवशेष मिळाले आहेत. हा जीवाश्म पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी संशोधकांच्या टीमला अनेक दिवस लागल्याचे म्हटले जात आहे. हा जीवाश्म मोठा शार्क मासा किंवा दुसरा कोणतातरी समुद्री जीव असल्याचा अंदाज आहे. या जीवाची निर्मिती १६ ते ९ कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

या संशोधकांच्या टीमचे नेतृत्व दिल्ली विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक गुंटुपल्ली वी आर प्रसाद यांनी केले. हे अवशेष जुरासिक काळातील असण्याची शक्यता असल्याने या संशोधन प्रबंधाचे नाव त्यांनी ‘फर्स्ट इक्थॅसॉर फ्रॉम द जुरासिक आॅफ इंडिया’ असे ठेवले आहे. हा जीवाश्म सापडणे ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना असून, त्यामुळे जुरासिक काळातील अनेक महत्त्वाचे संदर्भ मिळण्यास मदत होणार आहे, असे प्राध्यापक प्रसाद म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा – शरद पवार

News Desk

विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ममता-सोनियांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

का पडला किंगखान ममता दिदींच्या पाया

News Desk