HW News Marathi
देश / विदेश राजकारण

सोमवारीपर्यंत लेखी उत्तर द्या, निवडणूक आयोगाचे आदेश; पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार

मुंबई | शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) कोणताही निकाल आलेला नाही. आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला समोवारीपर्यंत (23 जानेवारी) लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तर आयोगासमोर पुढील सुनावणी ही 30 जानेवारीला होणार आहे. आयोगासमोर आज (20 जानेवारी) साडेतीन तास सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून आयोगासमोर युक्तीवाद झाला. आयोगासमोर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला.

आयोगासमोर झालेल्या सुनावणीत प्रतिनिधी सभा, नियुक्त्या, यावर कायदेशीर पद्धतीने दोन्ही गटाकडून युक्तीवाद केला गेला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. यामुळे पक्षप्रमुख पदाच्या कार्यकाळाला मुदत वाढ द्या, अशी मागणी देखील ठाकरे गटाने आयोगाकडे केली.  या पार्श्वभूमीवर कोणाच्या बाजून निकाल कोणाच्या बाजूने आणि कुठल्या आधारावर येणार, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Related posts

चीनची पुन्हा भारतात घुसखोरी

Gauri Tilekar

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk