मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. कोरोनाची परिस्थिती पाहात, केंद्रीय लोकसेवा आयो गाकडून (यूपीएससी) मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यूपीएससी परिक्षा सुरू करण्यावर चर्चा होत होत्या. अखेर आयोगाच्या बैठकीत आज (५ जून) यूपीएससी परिक्षेची तारीख जाहीर केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
परीक्षांच्या काळातच कोरोनाचा भारतात शिरकाव झाला. त्यामुळे अंतिम परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षा पुढी ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता सरकारने देशातील लॉकडाउन शिथिल करत सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्याच काम सुरू केले आहे. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात आज आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.