नवी दिल्ली | गुगलकडून काल (सोमवारी) ‘गुगल प्लस’ बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुगलने आपल्या यूजर्सचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी ‘गुगल प्लस’ ही त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्सचा डेटा धोक्यात असल्याची माहिती समोर येत होती. यात जवळपास पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. एका बगच्यामार्फत ही माहिती लीक केली जात होती.
Google's social network, Google+ was announced by the tech giant to be shutting down over a reported failure to reveal a security issue that affected hundreds of thousands of accounts
Read @ANI story | https://t.co/1eStlVnIyL pic.twitter.com/UZ671Qhahe
— ANI Digital (@ani_digital) October 9, 2018
गुगल प्लसची निर्मिती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत गुगलला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्यापूर्वी तो बग काढून टाकला जाणार आहे ज्यामुळे युजर्सची माहिती लीक होत होती. गुगल प्लस हे युजर्सच्या गरजेनुसारच तयार करण्यात आले होते. पण गुगल प्लसचा वापर मात्र अत्यंत कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे अखेर गुगल प्लस बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गुगल कंपनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.