HW News Marathi
देश / विदेश

गुगलच्या डुडलद्वारे शिक्षकांना शुभेच्छा

मुंबई । सर्च इंजिन म्हणून ओळखले जाणारे गुगल हे नेहमीच विविध क्षेत्रात अमुल्य असे योगदान देणा-या दिग्गजांना डुडलच्या माध्यमातून त्यांच्या कामगिरीला सलाम करते. तर काही वेळी गुगल दिनाचे औयित्य साधून खास डुडल तयार करून माहिती देत असते. तसेच ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे नेहमीच चागंले मार्गदर्शन करतात. अशा सर्व शिक्षकांना गुगलने डुडलच्या द्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कसे आहे गुगलचे डुडल

शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गुगलच्या डुडलमध्ये GOOGLE या अक्षरांमध्ये G मध्ये पृथ्वीला ग्लोब स्वरुपात दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब थोडा वेळ फिरत राहील्यानंतर ते थांबते. त्या G ला एक चष्माही लावण्यात आला आहे. त्यामुळे G हा एखाद्या शिक्षकाचा भास निर्माण केला आह. तसेच ग्लोब जेव्हा फिरून थांबते. तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत आणि खेळ या विषयांशी संबंधित असल्याचे काही सांकेतिक चिन्हे दिली आहेत.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली मद्रासपासून चाळीस मैल लांब चित्तूर जिल्ह्यातील तिरूताणी गावात झाला. तिरूपती येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वेलोर येथील व्हरीय या महाविद्यालयात तीन वर्षे उच्च शिक्षण घेऊन मद्रास येथून तत्त्वज्ञान विषय घेऊन विशेष प्रावीण्यासह ते बी.ए. झाले. १९५० ते १९६२ या काळात ते उपराष्ट्रपती, १९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे देशाचे दुसरे राष्ट्रपती झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

तामिळनाडूमध्ये पुन्हा राजकीय पेच

News Desk

दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांनी मोदींना फटकारलं 

News Desk