नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत मोदींवर राफेल विमान प्रकरण निरव मोदी बॅंक घोटाळा प्रकरणावर मोदींना टिकेचे लक्ष केले आहे. राहुल गांधींनी अनेक वेळा नीरव मोदी आणि मेहूल चौकसी या दोघांनी परदेशात पळ काढल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
पीएनबी घोटाळ्या बाबत ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. “नीरव मोदी ३०,००० कोटी रुपये घेऊन फरार झाला, पण मोदींनी यावर एक शब्दही बोलले नाहीत. मात्र आमच्या खिशातून ५००-१००० रुपयांच्या नोटा हिसकावून रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. मोदींनी ५००- १००० च्या नोटा आमच्या खिशातून काढून नीरव मोदीच्या खिशात टाकल्याचे राहुल यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
Modi Ji has destroyed the banking system. Nirav Modi fled with Rs 30,000 crore & PM didn't utter a word. We were forced to stand in queues as he snatched 500-1000 rupee notes from our pockets & put in Nirav Modi's pocket: Rahul Gandhi on Cash crunch pic.twitter.com/5vsKsBHxr0
— ANI (@ANI) April 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.