नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरोधात पोलीस यांच्यामधील तणाव कमी होण्याचे चिन्हा दिसत नाही. कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी शिलाँगला दाखल झालेले असताना पोलिसांनी सीबीआयच्या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले आहेत.
West Bengal: Kolkata police conducting raids at two different places of former CBI Director; one location is in Kolkata & the other at former CBI Interim Director M Nageshwar Rao's wife's company Angelina Mercantile Pvt Ltd at Salt Lake. pic.twitter.com/YwaGdieDXy
— ANI (@ANI) February 8, 2019
कोलकाता पोलिसांनी माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनी आणि घरावर आज (८फेब्रवारी) धाड टाकली आहे. नागेश्वर राव यांच्या पत्नीची अँजेलिना मर्कंटाईल प्रा. लि. नावाची सॉल्ट लेक येथे कंपनी आहे. कोलकाता पोलिसांच्या या छाप्यामुळे उद्या (९ फेब्रुवारी) होणाऱ्या राजीव कुमार यांच्या चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
West Bengal CM Mamata Banerjee: During the election, he (PM) becomes 'Chaiwalla' after the election he becomes 'Rafale walla'. pic.twitter.com/YE6lgutpD1
— ANI (@ANI) February 8, 2019
यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेमध्ये मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणुका आल्या की “मोदी चायवाले बनतात आणि संपल्याकी राफेलवाले बनतात,” अशी शब्दात मोदींवर ममता यांनी टीका केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.