HW News Marathi
देश / विदेश

देशातील ४० व्या संचार उपग्रहाचे प्रक्षेपण

नवी दिल्ली | इस्रोने युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून आज (६ फेब्रुवारी) पहाटे २.३० वाजता नवा जीसॅट ३१ हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या जीसॅट ३१ उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम एवढे असून या उपग्रहाच्या साहाय्याने भूमी आणि द्वीप समूहांना सेवा देण्यास मदत होईल. विशेष म्हणजे जीसॅट ३१ हा देशातील ४० वा संचार उपग्रह आहे. अवकाशातल्या कक्षेच्या आतील भागातील अन्य उपग्रहांच्या संचलन सेवांना कार्यान्वित ठेवण्याकरिता हा उपग्रह साहाय्य करेल.

पुढची १५ वर्षे या उपग्रह सेवा देईल. हा टीव्ही अपलिंक, डिजिटल सॅटलाईट, डीटीएच टीव्हीसारख्या सेवा पुरवणार आहे. त्याचप्रमाणे हा उपग्रह क्यू बॅन्ड ट्रान्सपॉन्डर्सची क्षमता वाढेल. इस्रोच्या माहितीनुसार, हा उपग्रह क्यू बँड ट्रान्सपॉन्डर्सच्या मदतीने अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंद महासागरात संचाराची सुविधा पुरविणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे आमच्यासाठी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्य!’

News Desk

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्राची सुरुवात राहुल गांधींनीच केली !

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवादी-जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ८ नागरिकांचा मृत्यू

swarit