अमृतसर | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मूसा अमृतसरमध्ये दिसल्यानंतर पंजाबात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी घुसल्याची धक्कादायक माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन करत अमृतसरमध्ये झाकीर मूसाचे पोस्टर्स लावल्याची माहिती गुरुदासपूरचे पोलिस अधिकारी स्वर्णदीप सिंग यांनी सांगितले आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरु असल्याचेही सिंग यांनी सांगितले.
We had inputs that some Jaish-e-Mohammed (JeM) terrorists have infiltrated in Punjab through Ferozpur. So have taken precautionary measures. Extra forces have been deployed. Checking is underway: Gurdaspur SSP Swarandeep Singh. (15.11.18) pic.twitter.com/csBCKvoCjd
— ANI (@ANI) November 16, 2018
#Punjab police have released posters of terrorist Zakir Moosa; Gurdaspur SSP Swarandeep Singh says, "We had inputs about his movements near Amritsar. So we have released wanted posters of him to make public aware & have requested public to tell us if they have any information" pic.twitter.com/iFocDlGmHj
— ANI (@ANI) November 16, 2018
दरम्यान, पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागानेही गुरुवारी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जैशचे दहशतवादी भारतात दाखल झाले असून ते राजधानी दिल्लीकडे कूच करत आहेत. ६ ते ७ दहशतवादी असून ते फिरोजपूरहून दिल्लीकडे जात असल्याचेही एका अधिकार्याने सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.