HW News Marathi
देश / विदेश

13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने 7 मुलींचे केले लैंगिक शोषण 

लंडन – माहिती – तंत्रज्ञानाच्या महाजालामध्ये अल्पवयीन मुलं भरडली जात आहेत. एका क्लिकवर सर्व गोष्टी उपलब्ध होत आहेत. त्यात अल्पवयीन मुलांनी पॉर्न फिल्मस् पाहण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र, त्याचे भयंकर परिणाम आता समोर यायला लागलेत. लंडनमध्ये एका 13 वर्षीय मुलानं पॉर्न फिल्म पाहण्याच्या व्यसनामुळे सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलानं या प्रकारची स्वतःहून कबुली दिली आहे.

आरोपी हा अल्पवयीन मुलगा आहे. तो पॉर्न फिल्म पाहण्याच्या प्रचंड आहारी गेला आहे. या व्यसनामुळे त्यानं पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर सात मुलींवर हल्ला केला. इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर पॉर्न फिल्म पाहिल्यामुळे हा हल्ला केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी आरोपीच्या आईच म्हणणं आहे की, ती आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

लंडनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तिथं अल्पवयीन मुलांमध्ये पॉर्न फिल्म पाहण्याचं प्रमाण मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळं लहान मुलांच्या इंटरनेटवापरावर निर्बंध आणण्यासाठी सरकार कायदे बनविण्याच्या तयारीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Watch Video : हत्तींची रुग्णालयातील सफारी एकदा पहाच

Manasi Devkar

माझा ठरलंय…मी आता वेगवान बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार ! फडणवीसांचा सूचक इशारा

News Desk

अखेर धर्म संसदेने निश्चित केली राम मंदिर निर्माणाची तारीख

News Desk