HW News Marathi
देश / विदेश

नवे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या बद्दलेल्या सीमारेषाचा नकाशा

मुंबई | देशाचे स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. आता या दोन्ही प्रांताची सीमारेषा दर्शवणारा अधिकृत नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नवीन नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर हे प्रदेश जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट करण्यात आले आहे. तर लडाख प्रांतामध्ये लडाखसह चीनने बळकावलेला अक्साई चीन आणि पाकिस्ताननने बळकावलेल्या गिलगिट-बाल्टिस्थान यांचा समावेश करण्यात आला आहे.

सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना कायद्यांतर्गत लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल, तर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश तयार झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्ये अस्तित्वात आली आहेत.  या दोन्ही राज्यांत संसदेने तयार केलेले अनेक कायदे लागू होणार असून दिल्लीप्रमाणेच विधानसभा, नायब राज्यपाल यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरचा कारभार चालणार आहे.  या प्रदेशाचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नायब राज्यपालांच्या माध्यमातून पाहिला जाणार आहे. आता देशात २८ राज्ये तर ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचा विचार गाव- खेड्यात पोहचवा ! | नाना पटोले

News Desk

मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये, सेनेचा मोदींना टोमणा

News Desk

कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी त्यात दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?

News Desk