HW News Marathi
देश / विदेश राजकारण

शिवसेना आणि धनुष्यबाणावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

मुंबई | शिवसेना आणि  धनुष्यबाण यावर आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोरची (Election Commission of India) आज (17 जानेवारी) सुनावणी ही संपली आहे. शिवसेना (Shiv Sena)आणि धनुष्यबाणावर पुढील सुनावणी शुक्रवारी (20 जानेवारी) होणार असून या आयोगासमोर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोणताही निर्णय झालेला नाही. गेल्या आठवड्यात देखील आयोगासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी आयोगाने आजच्या सुनावणीची तारीख दिली होती.

आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोनन्ही गटाकडून कागदपत्रे जमा करण्यात आली. यात ठाकरे गटाचे 23 लाख आणि शिंदे गटाचे चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर म्हटले की, शिंदे गटाने जमा केलेल्या कागदपत्रात काही त्रुटी असल्याचा दावा केला होता. परंतु, कपिल सिब्बल यांच्या दाव्यावर शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी आक्षेप घेत म्हणाले, शिंदे गटाने जमा केलेल्या कादपत्रात कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा त्यांनी आयोगासमोर केला.

ओळखपरेड करण्याची ठाकरे गटाची मागणी

ठाकरे गटाने आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रांची त्यांच्याकडून पूर्तता करण्यात आली असून या कागदपत्रातील कोणत्याही व्यक्तीला आयोगासमोर बोलवावे आणि त्यांची ओळखपरेड आणि छाननी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने आयोगाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांची देखील छाननी करण्यात यावी, असेही मागणी ठाकरे गटाने केली आहे.

आयोगाच्या सुनावणीनंतर शिंदे गटाचे खासदारांची माहिती

या सुनावणीनंतर शिंदे गटाचे खसादार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “शुक्रवारी पुन्हा यासंदर्भात आयोगासमोर युक्तीवाद होणार आहे. कपिल सिब्बल यांनी अजून वेळ मागितली आहे. आयोगाने कपिल सिब्बल यांची मागणी मान्य करत पुढील सुनावणी शुक्रवारी पुन्हा युक्तीवाद होणार आहे.  कपिल सिब्बल यांनी अजून दोन अडीच तास युक्तीवाद करायचा आहे. त्यासाठी वेळी हवी आहे. त्यानुसार, शुक्रवारी चार वाजता युक्तीवाद होईल.

संबंधित बातम्या

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे; निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा ट्रम्प मोदीशर्ट घालतात

News Desk

साताऱ्यातील पावसाचा एक राजकीय बळी !

News Desk

नाना पटोलेंनी दिली राहुल गांधींना भेट, केली मोठी घोषणा!

News Desk