HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाखांच्या वर

मुंबई | संपूर्ण जग हे सध्या कोरोनाविरुद्ध लढत आहे. गेल्या २४ तासात जगात ९० हजार १२८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ३ लाख ४६ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५५ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहे, अशी आकडेवारी जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिली आहे.

तसेच अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत तर ब्राझिल आणि रशियामध्येही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात ५३२ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील मृतांची एकूण संख्या ९८ हजार २१८ झाली. तर अमेरिकेत आतापर्यंत १६ लाख ६२ हजार ३७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेपाठोपाठ आता ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. ब्राझीलमध्ये ३७६,६६९ कोरोनाबाधित आहेत तर २३, ५२२ लोकांचा मृत्यू झाला. यूकेत ३६,९१४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या २६१,१८४ इतकी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे २६,८३७ लोकांचा मृत्यू झाला. २८२,४८० लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत ३२,८७७ मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा २३०१५८ इतका आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी ब्राम्हणांसाठी केलेल्या घोषणांच्या ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला ! चंद्रकात पाटलांची टिका

News Desk

जादा पैसे आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

News Desk

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk