HW News Marathi
Covid-19

कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन, आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या मानसिकतेत बदल !

नवी दिल्ली | डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत. यामुळे पोलिसांशी भावनिक नाते जोडले आहे. पोलीस ज्याप्रकारे समोर येत आहे ते उल्लेखनीय आहे. ज्याप्रकारे आपण या लढाईत लढत आहोत हे फार महत्त्वाचे आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले. मोदी यांनी आज (२६ एप्रिल) मन की बातमध्ये म्हणाले.

देशाच्या कानाकोपऱ्यातने लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रे येत आहेत. डॉक्टर असो, पोलीस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठे परिवर्तन घडले आहे, असे मोदी म्हणाले. आपण या लढाईदरम्यान समजाला, नागरिकाला आजूबाजूला बघण्याचा व्यापक दृष्टीकोन मिळाला आहे. घरात काम करणारे लोक असू दे, आजूबाजूचे किंवा इतर नागरिकांमार्फत आपल्याला हे बघायला मिळत आहे. डॉक्टर, रिक्षा चालक, भाजी मंडईत काम करणाऱ्या लोकांविषयी आपले जीवन व्यर्थ आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

 

मोदीच्या मन की बात या कार्यक्रमात प्रमुख मुद्दे

  • अगोदर पोलिसांबद्दल विचार करताना नकारात्मकतेशिवाय काहीच समोर दिसत नव्हतं. आता आपले पोलीस कर्मचारीच लोकांपर्यंत जेवण पोहचवण्याचं काम करत आहेत
  • भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन आहे.
  • टाळी, थाळी, मेणबत्ती यांमुळे सगळ्यांना प्रेरित केले आहे. यामुळे देशात यज्ञ सुरू आहे, ज्यात सगळे आपापले योगदान देण्यासाठी आतुर आहेत.
  • शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लोक ज्या शाळेत थांबलेत तिथे रंगरंगोटी करत आहेत. हीच ती पीपल ड्रिव्हन लढाई.
  • देशातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत लोकांनी नागरिकांनी असंतोष व्यक्त केलाय. या अध्यादेशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात हिंसेवर कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलीय
  • Covidwarriors.gov.in या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारनं डॉक्टर, आशा, NCC यांना एकत्र जोडण्यात आले आहे. तुम्हीही कोव्हिड वॉरियर बनू शकता.
  • देशातल्या सगळ्या भागात औषधीपुरवण्यासाठी ‘लाईफलाईन उडान’ हा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत ५०० टनांहून अधिक औषधी देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्यात आली आहे.
  • भारतातील रेल्वे ६० रेल्वे मार्गांवर १०० हून अधिक पार्सल सेवा पुरवत आहे.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
  • कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
  • आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत.
  • इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आज भारताचे आभार मानत आहेत. तेव्हा मान अभिमानाने उंचावते.
  • कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात गरम पाणी पिणे, काढा पिणे असे अनेक उपाय सांगितले आहेत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
  • जगाने योगाला ज्यापद्धतीने स्वीकारले, त्यापद्धतीने लवकरच जग आयुर्वेदाचा स्वीकार करेल. तरुणांनी आजच्या भाषेत आयुर्वेद जगापर्यंत पोहोचवायला हवा.
  • आता मास्कविषयीची आपली मानसिकता बदलत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय सोडली पाहिजे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही कमी

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk