HW News Marathi
देश / विदेश

कोपर्डी प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली( वृत्तसंस्था) कोपर्डी खटल्यातील एका आरोपीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह इतर पाच जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार करण्यासाठी आरोपी संतोष गोरख भवाळ यांनी ही याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. आरोपी भवाळ याने अॅड. उज्जवल निकम यांच्यासह रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे डायरेक्टर, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांना साक्षीदार म्हणून बोलविण्याची मागणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर केली होती. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. या विरोधात आरोपी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला होता. औरंगाबाद खंडपीठानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला होता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

सहकार कायदा – शरद पवार कृषिमंत्री असताना झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयानं केली रद्द!

News Desk

दहशतवादाच्या मुद्यावर आता शांत बसणार नाही | पंतप्रधान मोदी

News Desk