HW News Marathi
देश / विदेश

सुनेने दुधात विष मिसळलं. सासरकडील १३ जणांचा मृत्यू

इस्लामाबाद(वृत्तसंस्था): पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळले. या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरगडच्या दौलत पौर परिसरात ही घटना घडली आहे. आसिया असे या महिलेचे नाव असून दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न जबरदस्तीने केले होते. घरच्यांनी मनाविरूद्ध लग्न लावल्याने या मुलीने पतीलाच संपविण्याचा कट रचला. त्यासाठी तिने दुधात विष मिसळले. लग्नापूर्वी घरातून पळून जाण्याचा आसियाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर लग्न झाल्यावर पतीला मारण्यासाठी तिच्या प्रियकराने तिला विष आणून दिले होते, अशी माहिती मुजफ्फरगड पोलिसांनी दिली. पती अमजदला मारण्यासाठी तिने दुधात विष मिसळले. महिलेने पतीला दूध पिण्यास सांगितले, पण काही कारणाने तो दूध प्यायला नाही. त्यानंतर ज्या दुधात विष मिसळले होते, त्याची लस्सी बनवण्यात आली. महिलेच्या सासरची लोक विषारी दुधापासून तयार केलेली लस्सी प्यायले. पण या लस्सीमुळे कुटुंबातील २७ जणांना विषबाधा झाली. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू असून १४ जणांवर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. दुधात पाल पडल्याने ते विषारी झाले, अशी सगळ्यांची समजूत होती. पण नंतर आसियाने दुधात विष मिसळल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसियाच्या कथित प्रियकराला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील २ सुपुत्रांचा समावेश

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, सरकारकडून मात्र उपेक्षा

News Desk

अजित पवार अर्थमंत्री होणार ?

News Desk