HW News Marathi
देश / विदेश

व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात

मुंबई | देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आता सर्वसामान्या दिलासा देण्यासाठी एलपीजी गॅसच्या (LPG Gas) दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडर गॅसच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. आणि ही कपात फक्त व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. अद्यापही घरगुती गॅस म्हणजे 14. 2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये कपात झालेली नाही.

दरम्यान, दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर किंमती 1976.50 हून  1885 रुपये होणार आहे. तर कोलकातामध्ये 19950.50 रुपये आहे. तर आता यात 100 कपात  कमी करून होणार आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची 2095 हून आता 1844 इतकी झाली आहे. तर चेन्नईत 96 रुपयांनी स्वस्त झाले आहे. व्यावसायिक गॅ सिलेंडरच्या किंमती कपात केल्यामुळे  रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक यांचा मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली जात आहेत. दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत 36 रुपयांने कपात करण्यात आली होती.   १९ मे २०२२, १ जून २०२२, १ जुलै २०२२, ६ जुलै २०२२ आणि १ ऑगस्ट २०० रोजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनआयएने इसिसच्या १० संशयितांना अटक करून घातपाताचा कट उधळला

News Desk

काँग्रेसच्या महाअधिवेशनला सुरुवात

News Desk

सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या जबाबदारीतून पळ काढू नये !

News Desk