HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या उत्सवासाठी अवघी मऱ्हाट नगरी सज्ज झाली आहे. आजपासून सुरू झालेल्या या उत्सवाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मराठी बोलीतून शुभेच्छा दिल्या.

पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना दिवस कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषण केले. संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, साबरमती आश्रम निर्माण आणि चंपारण सत्यग्रहला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला या तिन्ही बाबींनी वेगळी दिशा दिली आहे. त्यामुळे इतिहासात या तिन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महादेव जानकर हेही उपस्थित होते.

या भाषणाचा समारोप करताना मोदी अचानक मराठीत बोलू लागले. त्यांनी कार्यक्रमातील पुरस्कार विजेत्यांचे मराठीतून अभिनंदन केले. तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही मराठीतून दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk

पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस

News Desk

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk