HW News Marathi
देश / विदेश

रिझर्व्ह बँकेचे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध, बँकेचे सर्व व्यवहारसह बंद

मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईमधील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर आरपीआयने निर्बंध लादण्यात आले आहे. तसेच या बँकेतील खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम ३५-अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बँकेवर हे निर्बंध आणल्याचे आरपीआयने म्हटले आहे. आरबीआयने काल (२३ सप्टेंबर) आजपासून हे निर्बंध लादले आहे. आरबीयाच्या बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ शकत नाही. आणि जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट संकेत आरबीआयेने दिले आहे.

निर्बंधाच्या काळात पीएमसी बँके ‘या’ गोष्टी करून शकते

रिझर्व्ह बँकेने निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. मात्र, हा ठेवीदार बँकेचा कोणत्याही प्रकारचा देणेकरी असल्यास किंवा कर्जाचा हमीदार असल्यास ही रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. निर्बंधच्या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग व स्टेशनरी. पत्रव्यवहार कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल. मात्र, वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी असलेल्या विमा योजनेसाठी याशिवाय इतर काही आवश्यक खर्च करण्यासाठी बँकेला परवानगी देण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आदित्यनाथ यांचे उदयनराजेंनी मानले आभार

News Desk

अजित पवार म्हणतात ‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर दिला मोदींना शब्द

News Desk

कोरोना चाचणीसाठी आता सर्वात स्वस्त टेस्टिंग किट बाजारात उपलब्ध!

News Desk