HW News Marathi
देश / विदेश

मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्य -सर्वोच्च न्यायालय

वॉशिंग्टन |अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देशांच्या नागरिकांवर लादलेली प्रवेशबंदी योग्यच आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ट्रम्प सरकारचा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी टि्वटरवर ‘वॉव’ असे लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुस्लिम देशांच्या नागरिकांवरील प्रवेशबंदीच्या निर्णयावर सर्वबाजूंनी जोरदार टीका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रवेश बंदी योग्य ठरविल्यामुळे आता हा वाद संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिकेत प्रवासबंदीच्या इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन होते किंवा अमुक एका धर्मावर अन्याय केला जातोय हे सिद्ध होऊ शकलेले नसल्याचे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय योग्य ठरविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखिलेश यादवकडून शहीद पत्नीऐवजी भलतीचाच सत्कार

News Desk

मोदीच्या टपरीचे रूप पालटणार

News Desk

गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे – सुनील केदार 

News Desk