नवी दिल्ली । देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी (६ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “सुषमा जी यांचे निधन हे वैयक्तिक नुकसान आहे. देशासाठी त्यांनी जे काम केले त्यासाठी त्या कायमच स्मरणात राहतील. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती”, या आशयाचे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sushma Ji’s demise is a personal loss. She will be remembered fondly for everything that she’s done for India. My thoughts are with her family, supporters and admirers in this very unfortunate hour. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
“सुषमा जी यांनी गेल्या ५ वर्षांत परराष्ट्रमंत्री म्हणून ज्या पद्धतीने न थकता, अखंडपणे जे काम केले आहे ते मी विसरूच शकत नाही. त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील त्या आपल्या कामाला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या. त्यांच्या या वचनबद्धतेची आणि हिंमतीची तुलना कशाचीही होऊ शकत नाही”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
I can’t forget the manner in which Sushma Ji worked tirelessly as EAM in the last 5 years. Even when her health was not good, she would do everything possible to do justice to her work and remain up to date with matters of her Ministry. The spirit and commitment was unparalleled.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
“एक उत्कृष्ट प्रशासक असणाऱ्या सुषमा जी यांनी हाताळलेल्या प्रत्येक मंत्रालयात त्यांनी आपला आदर्श निर्माण केला आहे. विविध देशांशी भारताचे संबंध अधिक चांगले करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंत्री म्हणून आम्ही त्यांची मायाळू बाजू देखील पाहिली. कोणत्याही भागात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना त्यांनी तात्पुरतेने मदत केली”, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
An excellent administrator, Sushma Ji set high standards in every Ministry she handled. She played a key role in bettering India’s ties with various nations. As a Minister we also saw her compassionate side, helping fellow Indians who were in distress in any part of the world.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.