HW Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणात मध्यस्थीची नेमणूक करायची की नाही, यावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी

नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीची नेमणूक करायाची की नाही. यावर आज (६ मार्च) सर्वोच्च न्यायालया महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी (२६ फेब्रुवारी) मध्यस्थ नेमायचा की नाही यावर ६ मार्च रोजी निर्णय देण्यात येईल असे सांगितले होते.

अयोध्येतील प्रकरणाचा मुद्दा हा संवेदनशील असून हा वाद मध्यस्थीने समझोत्याच्या माध्यमातून सोडविण्याची फार आवश्यकता आहे. तरी देखील मध्यस्थ हा पर्यायाचा वापर केला पाहिजे, असे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले होते.

अयोध्या जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ नेमण्याच्या न्यायालयाच्या सूचनेवर काही मुस्लिम पक्षकारांनी सहमती दर्शविली आहे. तर रामलल्ला विराजमान यांनी यावर आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही मध्यस्थ नेमण्याची प्रक्रिया अयशस्वी ठरली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आयोध्या प्रकरणावर निकाल देताना मध्यस्थीचे प्रयत्न झाले होते. परंतु त्यावेळी ते अयशस्वी झाले.

 

Related posts

अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी अलीगड पोलिसांनी ४ जणांना केली अटक

News Desk

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

भारताने युद्धाची भाषा केली तर मंदिरातील घंटानाद कधीही ऐकू येणार नाही !

News Desk