नवी दिल्ली | “येत्या नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचे विनाशकारी चित्र दिसेल, असा दावा ‘आयसीएमआर’ने केला आहे”, असे वृत्त जवळपास सर्वच माध्यमांकडून देण्यात आले. दरम्यान, सोमवारी (१५ जून) दुपारी ‘आयसीएमआर’कडून हा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे. या वृत्तात करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे ‘आयसीएमआर’ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. ‘आयसीएमआर’कडून तसे स्पष्ट ट्विट करण्यात आले आहे. दरम्यान, ‘आयसीएमआर’च्या नावाने हे वृत्त पसरल्याने निश्चितच एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आधीच देशात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना ‘नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचे विनाशकारी चित्र दिसेल. या महिन्यात कोरोना संसर्गाचा पिक पॉईंट असेल’ असे वृत्त ‘आयसीएमआर’च्या सर्व्हेच्या नावाने फिरत असल्याने चिंता वाढण्यास सुरुवात झालेली असताना ‘आयसीएमआर’ हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
The news reports attributing this study to ICMR are misleading. This refers to a non peer reviewed modelling, not carried out by ICMR and does not reflect the official position of ICMR. pic.twitter.com/OJQq2uYdlM
— ICMR (@ICMRDELHI) June 15, 2020
काय आहे ‘तो’ कथित सर्व्हे ?
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी देशात लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कारण असे कि, देशात ३४ दिवसांनी येणार कोरोना संसर्गाचा पिक पॉईंट ७४ दिवासांवर पुढे ढकलला गेला. मात्र, असे असले तरीही येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये देशात कोरोनाचे विनाशकारी चित्र दिसेल. या महिन्यात कोरोना संसर्गाचा पिक पॉईंट असेल असा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व्हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ‘आयसीएमआर’च्या नावाने फिरत होता. अनेक माध्यमांनी याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध केले. मात्र, त्यानंतर तातडीने ‘आयसीएमआर’कडून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.