HW News Marathi
Covid-19

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

जळगाव | राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी ही माहिती दिली आहे. गुलाबराव पाटील यांची प्रकृती ठिक असून मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, काल (१८ मार्च) जळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांच्याशी अनेक लोकांचा संपर्क आला आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी काल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…बोलत राहिलास तर ट्रेलर देईन, निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा

News Desk

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण…

News Desk

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

News Desk