HW News Marathi
देश / विदेश

राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकात सावरकरांवरील अभ्यासक्रम वगळला

जयपूर । राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आले असून अशोक गेहलोत राज्याचे मुख्यमंत्री आहे. गेहलोत सरकारने राजस्थानच्या शालेय पाठ्यापुस्तकात इतिहास बदलला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील विस्तृत धड्याला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. राजस्थानमध्ये अशा प्रकारची घटना होणे ही काही काय पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांचे सरकार होते. तेव्हा शालेय पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील काही भाग वगळलेला होता. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना अनुकूल असलेल्या सावरकांविषयी विस्ताराने माहिती दिलेली होती. आताचे सरकार गांधी-नेहरूंच्या इतिहासाला पुन्हा प्राधान्यक्रम देत आहे.

तसेच भाजपच्या सरकारच्या काळात अभ्यासक्रमात मोगल शासकांचा उल्लेख सामुहिक हत्याकांडे घडवणारे आणि हिंदू राजांशीझालेल्या अनेक लढायांतून पराभव पत्करणारे, असा केला गेला होता. प्रत्येक सत्ताधारी जर शालेय अभ्यासक्रमात बदला करू लागल्यामुळे देशाच्या भावीपुढीला खरा इतिहास बद्दल माहिती होणे अवगड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related posts

सचिन तेंडुलकर अखेर राज्यसभेत हजर

News Desk

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk

गुजरातमध्ये काळाचा घात, भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू

News Desk