नवी दिल्ली | कोरोना रुग्णांना डिस्चार्जच्या देण्याच्या संर्भात बदलेल्या नियम आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या बरे होणाच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आज (११ मे) कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यापैकी २०९१७ जण बरे झाले असून आता ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण आढळून आले. तर १५५९ जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ३१.१५ टक्क्यांवर गेले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
The total number of recoveries is 20917, 44029 people are under active medical supervision. In last 24 hours, there were 4213 new cases & 1559 recoveries. Recovery rate is now at 31.15%. Total number of cases is at 67,152: Lav Agarwal, Joint Secretary of Health Ministry #COVID19 pic.twitter.com/cVWiV9fOvn
— ANI (@ANI) May 11, 2020
“कोरोनाची लक्षणे दिसल्यास कुणीही लपवू नयेत. तातडीने संबंधितांना सागून उपचार सुरू करावेत. आपण लक्षणे लपवून ठेवली, तर केवळ तुम्हीच आजारी पडणार नाहीत, तर कुटुंबीयांच्या आरोग्यालाही धोक्यात घालत असाल,” असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना केले आहे.
As per revised policy, mild/very mild/pre-symptomatic cases admitted to COVID care facility can be discharged after 10 days of symptom onset & if there is no fever for 3 days. No need to test before discharge, home isolation advised after discharge: Lav Agarwal, Health Ministry https://t.co/tlTkIc1oS6
— ANI (@ANI) May 11, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचनेनुसार, “सौम्य ते अति सौम्य आणि लक्षणे दिसण्यापूर्वीच्या रुग्णांना उपचारानंतर कोविड रुग्णालयातून १० दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तसेच गेल्या तीन दिवसांत संबंधित रुग्णाला ताप आला नसेल तरच हा डिस्चार्ज दिला जाईल. अशा रुग्णांना डिस्चार्ज देताना चाचणीचे बंधन राहणार नाही. त्या रुग्णांना होम क्वारंटाईन सल्ला देण्यात येईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.