मुंबई | भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताच्या बाजूने एकूण १९२ वैध मतांपैकी १८४ मते मिळाली आहेत. २०२१-२२ या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. भारताच्या निवडनंतर अमेरिकेने ट्वीट करुन म्हटले आहे की “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रश्नांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”
The United Nations member States elect India to the non-permanent seat of the Security Council for the term 2021-22 with overwhelming support. India gets 184 out of the 192 valid votes polled: TS Tirumurti, Permanent Representative of India to the United Nations (file pic) pic.twitter.com/LDpaOSuDiP
— ANI (@ANI) June 17, 2020
२०२१-२२ या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली. तर १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या ७५ व्या सत्राचे अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि आर्थिक-सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड केली. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वेची सुरक्षा परिषदेत निवड झाली आहे. कॅनडाला मात्र यामध्ये स्थान मिळालेले नाही.
भारत यााधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) सात वेळा सदस्य राहिला असून १९५०-१९५१, १९६७-१९६८, १९७२-१९७३, १९७७-१९७८, १९८४-१९८५, १९९१-१९९२ आणि शेवटी २०११-२०१२ मध्ये भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य राहिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.