HW News Marathi
देश / विदेश

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

नवी दिल्लीः महामार्गालगत पाचशे मीटर अंतरावर बिअर बार, वाइन शॉप सुरू ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले असले तरी महापालिका क्षेत्रात हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मोठ्या शहरात महामार्गालगत बंद झालेली सर्व बिअर बार, दारुची दुकाने पुन्हा सुरू होणार आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर बुधवारी यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी महामार्गालगत असलेल्या दारूच्या दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच ही दुकाने पाचशे मीटर अंतरावर सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे महामार्गालगतचे अनेक दुकाने बंद झाली. परंतु सर्वोच्च न्यायालयच्या निकालाचा अर्थ न उमजल्याने महानगरपालिका क्षेत्रात देखील ही बंद लागु करण्यात आली होती. परिणामी मोठ्या शहरातील शेकडो दारुची दुकाने, बिअरबार बंदी पडली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका क्षेत्रातील दारु दुकाने, बिअरबारवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे मार्गदर्शन ऐकताना जातीय भेदभाव

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

News Desk