मुंबई | संसदेचे हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन आज (7 डिसेंबर) सकाळी सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जी 20 परिषदेच्या अध्यक्षपद भारताला मिळणे ही मोठी संधी असून जगाच्या मंचावर भारताने आपले वेगळे स्थान मिळाले असून यामुळे जगाच्या भाताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आपल्याला ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. या जी-20 परिषदेत देशाचे महत्वाचे निर्णय होतील.”
The manner in which India has made a space in global community, the manner in which expectations with India have risen & the manner in which India is increasing its participation on global platform, at a time like this, India receiving the #G20Presidency is a huge opportunity: PM pic.twitter.com/GkZgHZY7nY
— ANI (@ANI) December 7, 2022
सर्व पक्षाच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली आहे. अधिवेशनात देशाच्या विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अनेक महत्वाचे पूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. सर्व राजकीय पक्षांशी चांगली चर्चा झाली आहे. यांचे प्रतिबिंब सभागृहात देखील दिसून येतील. या चर्चे विरोधी पक्षातील खासदारांनी स्थगिती आणि गोंधळामुळे बोलण्याची संधी मिळत नसल्याचे म्हणणे मांडले आहे. या सर्व पक्षाच्या खासदारांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. लोकशाहीसाठी हे गरजेचे आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.