नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आज (३० ऑगस्ट) मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीयकृत सार्वजनिक बँकांचे १० बँकेचे विलीनीकरण करण्यात आल्यचे सीतारामन यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन सीतारामन यांनी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जावर लक्ष राहावे यासाठी विलीनीकरण करण्यात येणार आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman: Canara Bank with (merge) Syndicate Bank, they will be the fourth largest Public Sector Bank with business of Rs 15.20 lakh crores. pic.twitter.com/nRshTrYLxS
— ANI (@ANI) August 30, 2019
पीएनबी, ओरिएन्टल बँक , सिंडीकेट बँक , कॅनरा बँक , कॉरर्पोरेशन बँक, युनायटेड बँक, इंडियन बँक, अलाहाबाद बँक, युनियन आंद्रा बँक इ. बँका विलीन होणार आहेत. सध्या बँकिंग क्षेत्र अडचणीत आहे. त्या दृष्टीने सरकारकडून हे निर्णय घेण्यात आले आहे. बँकांमधून कर्मचाऱ्यांची कपात करणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. त्याचबरोबर सरकार, कर्ज बुडवून पळून गेलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ३ लाख बोगस कंपन्या बंद करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी यावेळी दिली. २०१७ मध्ये २७ बँकांचे राष्ट्रीयकृत सार्वजनिक करण्यात आले होते.
Finance Minister Nirmala Sitharaman: Punjab National Bank, Oriental Bank of Commerce and United Bank will be brought together and they shall form the second largest public sector bank with business of Rs 17.95 Lakh Crore. pic.twitter.com/QhFCMVq2Gn
— ANI (@ANI) August 30, 2019
तसेच आता सरकार गृह निर्माणवर विशेष लक्ष देणार आहे. तर गृह कर्जाच्या व्याज दारात कपात होणार आहे.५ ट्रिलीयनकडे अर्थव्यवस्था नेण्यासाठी हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.