मुंबई | “तुम्हाला जर बलात्कार थांबवता येत नाही. तेव्हा झोपा आणि मजा करा,” असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे देशभरातील सर्व स्तरातून कुमार यांच्यावर टीका होत होती. यानंतर कुमारांनी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांनी सभागृहात माफी मागितली आहे.
यावेळी सभागृहात कुमार यांनी माफी मागता म्हणाले, “माझ्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगीर व्यक्त करत आहोत. हे प्रकरण आणखी वाढून नये, असे त्यांनी आज (१७ डिसेंबर) विधानसभेच्या सभागृहात म्हणाले.
If it hurts the sentiments of women, I've no problem apologising. I apologize from the bottom of my heart: Congress MLA KR Ramesh Kumar in Karnataka Assembly on his 'rape' remark made in the House yesterday.
"He has apologized, let's not drag it further," says Speaker VH Kageri. pic.twitter.com/7u3HeaSbLr
— ANI (@ANI) December 17, 2021
कर्नाटकच्या विधमंडळात काल (१६ डिसेंबर) राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी काँग्रेस नेते वेळ मागत होते. सर्व आमदार विधानसभेत सभापती विश्वेश्वर हेगडे यांच्याकडेही कमी वेळ असून आमदारांनी सभागृहाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. परंतु हेगडेंना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चर्चा संपवायची होती. यामुळे सभापती सभागृहात सुरू असलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली.
कुमार नेमके काय म्हणाले
गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. “तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,” असे सभापतींनी आमदारांना सांगितले.सभागृहाचे कामकाज चालत नसल्याची खंत सभापती हेगडेंनी व्यक्त केली. यावेळी कुमार म्हणाले, “एक म्हण आहे, की जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही. तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही सध्या त्याच स्थितीत आहात,” असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले. कुमारांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर सभागृहात उपस्थित सर्व आमदार आणि इतर काही नेते हसत होते.
#WATCH| "…There's a saying: When rape is inevitable, lie down&enjoy," ex Karnataka Assembly Speaker & Congress MLA Ramesh Kumar said when Speaker Kageri, in response to MLAs request for extending question hour, said he couldn't& legislators should 'enjoy the situation' (16.12) pic.twitter.com/hD1kRlUk0T
— ANI (@ANI) December 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.