HW News Marathi
व्हिडीओ

सत्तेतल्या लोकांना अक्कला नाहीत!; राजकीय आरक्षण गेल्याने OBC चं ‘भीक मांगो’ आंदोलन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांतील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे . इम्पेरिकल डाटा जमा गोळा करण्याचे काम निधीअभावी झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये ओबीसीच्यावतीने भीक मांगो आंदोलन शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात करण्यात आलंय . सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनास ओबीसीचा इम्पेरिकल डाटा तयार करून सादर करण्यास सांगितले होते . यासाठी राज्य मागासवर्ग आयोगास निधी उपलब्ध करून दिला नाही . त्यामुळे डाटा तयार झाला नाही . परिणामी ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे . जिल्ह्यातील ओबीसीच्या सर्व जातसमूहाच्यावतीने आज सकाळी 1:30 वाजता महात्मा फुले पुतळा , आयटीआय नांदेड येथे हे आंदोलन करून इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी निधी जमा करून राज्य शासनास सुपूर्द करण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिल्यात. केंद्र सरकारने वेळीच डाटा उपलब्ध करून न दिल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याचाही प्रतिक्रिया दिल्यात या वेळी शेकडो महिलांना पुरुषांची उपस्थिती होती

#UddhavThackeray #SupremeCourt #OBCReservation #Maharashtra #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #PankajaMunde #ChandrashekharBawankule #AshishShelar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..अजून नगरसेवकांना बघितल सुद्धा नाही; नागरिकांचा गंभीर आरोप

News Desk

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

News Desk

Pravasi Bhartiya Divas 2019 | परदेशी भारतीयांनी व्यक्त केल्या भावना

Atul Chavan