HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींनी देशासाठी स्थापन केल्या ‘या’ तीन महत्त्वाच्या समित्या

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सुरक्षा), कॅबिनेट कमिटी ऑन इकनॉमिक (आर्थिक) आणि कॅबिनेट कमिटी ऑन इम्पलॉयमेट (बेरोजगारी ) या तीन समस्या सध्या देशाला भेडसावत आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी देशात पहिल्यांदा अशा समितींची स्थापन करण्यात आली आहे. या समिती मोठ्या नेते मंडळींचा समावेश करण्यात आला आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सुरक्षा)

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सुरक्षा) या कमिटीत पाच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात स्व:ता पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारतीय सल्लागार अजित डोबाल यांचा या कमिटीमध्ये सामील केले आहे. ही कमिटी देशातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असून पाकिस्तान आणि इतर अंतरराष्ट्रीय समस्येवर तोडगा काढण्याचे काम करणार आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन ईकॉनॉमिक (आर्थिक)

कॅबिनेट कमिटी ऑन ईकनॉमिक (आर्थिक)या कमिटीमध्ये देखील ५ मंत्र्यांचा समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पियुष गोयल, रस्ते आणि वाहतूक नितीन गडकरी या मंत्र्यांचा कमिटीमध्ये समावेश होणार आहे. ही कमिटी देशातील आर्थिक समस्या निवारण करण्याचे काम करणार आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन एम्पलॉयमेट (बेरोजगारी )

कॅबिनेट कमिटी ऑन एम्पलॉयमेट (बेरोजगारी ) या कमिटीत १० मंत्र्यांचा समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पियुष गोयल, रस्ते आणि वाहतूक नितीन गडकरी, कृषी, ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशांक, दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, कैशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे, कामगार व रोजगार मंत्री संतोष गंगवार आणि गृहनिर्माण व नागरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी या मंत्र्यांचा कमिटीत समील करण्यात आले आहे. ही कमिटी देशातील बेरोजगारी भयावह समस्या दुर करण्यासाठी काम करणार आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकराच्या तीन कमितीची स्थापना करण्यात आली असून या तिन्ही समस्येने देशातील जनता त्रस्त आहे. यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून या समस्येचे समुळ उच्चाटन करण्या गरजेचे आहे.

Related posts

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

ट्विटर कडून राहुल गांधींवर कारवाई !

News Desk

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk