HW News Marathi
राजकारण

राज्यातील दुष्काळाबाबत चर्चेसाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | राज्यात सध्या भीषण दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळासह अन्य अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच ७ जून रोजी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. लोकसभा निवडणुकांनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता राज्यातील भीषण दुष्काळस्थितीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार गेले अनेक दिवस राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. याचसंबंधी चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर ७ जून रोजी शरद पवार यांची भेट होणार आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर २ वेळा राज्यातील दुष्काळस्थिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. गेल्या भेटीत त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. आता पुन्हा याच संदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ गडकरींना कॉंग्रेस अध्यक्षांचा सवाल

News Desk

निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या दावणीला बांधलेले आहे !

News Desk

शिवसेनेच्या लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती

News Desk