HW Marathi
देश / विदेश

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

मुंबई | महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या शिकाऱ्याने २ नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात नरभक्षक ‘टी 1’ म्हणजे अवनी वाघिणी ठार केले आहे. या वाघिणीने तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी एका वाघाला ट्रॅक्‍टरखाली चिरडून-ठेचून ठार केल्याची घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात ओडिशामध्येही एका खड्ड्यामध्ये सापडलेला सांगाडा वाघाचा असल्याचे आता उघड झाले आहे. देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला आहे.

याआधी अखेरची व्याघ्रगणना २०१४ साली झाली होती. या गणनेनुसार वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या सात राज्यांत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा समावेश होता. तर ओडिशामधील वाघांची संख्या कमी होती. २०१४ सालच्या गणनेत देशात वाघांची संख्या २,२२६ एवढी होती अशी माहिती मिळते. तर २०१० साली १७०६ एवढी वाघांची संख्या होती. याचाच अर्थ, चार वर्षांत वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात २०१० मध्ये १६९ वाघ होते; २०१४ मध्ये ही संख्या १२ टक्‍क्‍यांनी वाढ होऊन १९० एवढी झाली होती. उत्तर प्रदेश (२०१० मध्ये 118 तर २०१४ मध्ये ११७) आणि ओडिशा (२०१० मध्ये ३२ तर २०१४ मध्ये २८) या राज्यांत मात्र वाघांची संख्या स्थिर होती. झारखंड या एकाच राज्यात वाघांच्या संख्येत घट झाली होती. दरम्यान, २०१४ सालच्या व्याघ्रगणनेत वाघांची सर्वाधिक संख्या कर्नाटकमध्ये (४०६) असल्याचे आढळले होते.

Related posts

टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपींना स्वतंत्र लेन | मद्रास उच्च न्यायालय

News Desk

पेट्रोल-डिझेलवर अनुदान दिले तर कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील

News Desk

आयएसआयएसचे नवीन मॉड्युल दिल्लीसह उत्तर प्रदेशात सक्रीय

News Desk