HW News Marathi
देश / विदेश

टाईम मॅक्झिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश

अमेरिका | अमेरीतील प्रसिद्ध मॅगजिन टाइमने जगातील १०० प्रभावी व्यक्तिमत्वांच्या नावाची सूची जारी केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्यासह या यादीत सामील करण्यात आले आहे. या यादीत सामील भारतीयांपैकी बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्‍ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांचीही नावे आहेत.

पीएम टाइम मॅगजिनने पीएम मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक केवळ स्वतंत्र्यपणे निवडणुका घेणं नाही. कोणाला किती मतं मिळाली केवळ हेच यातून समोर येतं. भारत देश गेल्या ७ दशकांपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात १.३ अरब लोकसंख्येत मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आदी विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींशीवाय या यादीत, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, तैवानच्या राष्‍ट्रपती त्‍साई इंग वेन, जर्मन चांसलर अँजेला मर्केल, जो बिडेन आणि कमला हॅरिस यांच्यासह जगातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.आयुष्‍मान खुराना एकमेव भारतीय कलाकार – आयुष्‍मान खुराना हा या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कलाकार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोड होणार

News Desk

आज आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

Gauri Tilekar

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला आणि कार सील

swarit