HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात आता होण्यास सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस भाजप आणि खडसे यांच्यात काही अलबेल नसल्याचे अनेक गोष्टींवरुन दिसून आले होते. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातही शाब्दिक युद्ध झालेले देखील सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामूळे भाजपचे इतके ज्येष्ठ नेते अजूनही त्यांना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत वेळोवेळी एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली होती.

दरम्यान, एकनाथ खडसे यांचा प्रवेश राष्ट्रवादीत होणार का यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरु असल्याचे समजत आहे. त्यामूळे ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपमध्ये सक्रिय काम केल्यानंतरही किंमत मिळत नसल्याचे खडसे भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!

News Desk

कोरोनासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक;, नव्या विषाणूवर होणार चर्चा

News Desk