नवी दिल्ली | अयोध्याप्रकरणीसर्वोच्च न्यायालयात आज (४ जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.
मंदिर वही बनायेंगे
लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राम मंदिरासाठी पुन्हा मागणी जोर पकडू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटना ठिकठिकाणी बैठका, सभा घेत असल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढत आहे. संघानेही राम मंदिरासाठी वेगळा कायदा आणण्याची मागणी केली आहे.
Supreme Court will take up the Ram Janmabhoomi-Babri Masjid case along with public interest litigation questioning delay in the adjudication of the matter on Friday
Read @ANI story | https://t.co/f5pFGbigAz pic.twitter.com/IgWBvTzlPs
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.