HW News Marathi
Covid-19

तिसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यामध्ये काही सेवांना सूटही देण्याची शक्यता

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन आज (१७ मे) संपणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले असून आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. १८ मे पूर्वी लॉकडाऊन ४ ची माहिती दिली जाईल, असे मोदींनी सांगितले होते.

केंद्र सरकारने राज्यातील जिल्ह्यातील झोन निश्चित करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला मिळावे. तर आता झोननुसार स्वातंत्र्य हे केंद्र सरकारकडे आहे. राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. हे सर्व झोन केंद्राने तयार केलेल्या निकषावर आधारित आहेत. त्यामुळे आता झोन निश्चित करण्याचे स्वातंत्र्य देण्याची मागणी राज्य सरकारने मोदींसोबत झालेल्या चर्चेच्या वेळी केली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात वाहन, बस आणि कॅब सेवेस परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचे संकट पाहता विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू होणार

News Desk

राज्यात फक्त पुढचे १० दिवस पुरेल इतक्याच लसी शिल्लक ! केंद्र सरकारला लिहिले पत्र

News Desk

“…लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी”, लॉकडाऊनबाबात आरोग्यमंत्र्यांचे सुचक वक्तव्य

News Desk