HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारची आज कसोटी, टीडीपी, कॉँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली | तेलुगु देसम पक्ष (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करणार आहेत. वायएसआर काँग्रेसचे वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी अविश्वास प्रस्ताव सोमवारच्या कार्यवाही यादीत समावेश करण्यासाठी लोकसभा सचिवांना पत्र लिहिले आहे.

टीडीपीनेही अविश्वास प्रस्तावासाठी नोटीस दिली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता आहे. “आंध्र प्रदेश राज्याचे वेगळे प्रश्न आहेत. अजूनपर्यंत आम्ही अविश्वास प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नसून उद्धव ठाकरे याचा निर्णय घेतील”,

असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शुक्रवारी या दोन्ही पक्षांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव सादर होऊ शकला नव्हता. शुक्रवारी विविध विरोधी पक्ष हे अनेक मुद्द्यांवर सभागृहात गोंधळ घालत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल ! मुंबईसाठी राऊतांची साद

News Desk

राष्ट्रवादीला का हवाय पियुष गोयल आणि रविशंकर प्रसाद यांचा राजिनामा 

News Desk

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk