HW News Marathi
देश / विदेश

अॅट्रॉसिटी कायद्या | आज दलित-आदिवासी संघटनांची ‘भारत बंद’ची हाक

नवी दिल्ली | अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित-आदिवासी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते, आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदबाबतची माहिती ट्विटरवर दिली असून लोकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदच्या निमित्ताने सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत अहमदाबाद सारंगपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमा होण्याचे आवाहन जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये काल सायंकाळी ५ वाजल्यापासून आज सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

आज पंजाबमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून उद्या परिवहन सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढविण्याचा प्रस्ताव पास

News Desk

#Lockdown2 : लॉकडाऊन वाढवण्याच्या मोदींच्या निर्णयाचे WHO ने केले स्वागत

News Desk

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

swarit