HW News Marathi
देश / विदेश

#Lockdown2 : लॉकडाऊन वाढवण्याच्या मोदींच्या निर्णयाचे WHO ने केले स्वागत

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) घेतला. जागतिक आरोग्य संघटनेने मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी योग्यवेळी भारताने हा निर्णय घेतला आहे असे, जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशक डॉ.पुनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले. अद्याप याचा परिणाम काय होईल हे आत्तात सांगणे उचित ठरणार नाही. मात्र, लॉकडाऊनच्या वाढवलेल्या कालावधीत रुग्णांची योग्य चाचणी, आयसोलेशन आणि सोषल डिस्टन्स ठेवल्यास कोरोनाशी लढण्यासाठी खुप मदत होईल.

कोरोनाच्या या काळात जितका संयम हा आरोग्य संघटना, पोलीस कर्मचारी, सरकारने ठेवला आहे तितकाय भारतीयांनीही ठेवला आहे हे फार महत्त्वाचे आहे. सगळेजण एकत्र मिळून कोरोनाशी सामना करत आहेत. अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेने भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात कोरोनाचा हाहाकार

swarit

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

‘तब्बल १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले’

News Desk