भुवनेश्वर | ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (११ ऑक्टोबर)ला ‘तितली’ या चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळामुळे संपुर्ण परिसराला तडाखा बसला आहे. बंगालाच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याने तितली या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण धारण केले आहे. तितली या चक्रीवादळमध्ये आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात तितली चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Total 57 people have died & 57,131 houses damaged due to #TitliCyclone and subsequent flood&landslide in the state, till now: Special Relief Commissioner (SRC). #Odisha (18.10.2018)
— ANI (@ANI) October 19, 2018
ओडिशा सरकारने राज्यात हाय अलर्ड जारी करण्यात आला असून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना काही दिवसासाठी सुट्टी देण्यात आली आहे. लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तितली या चक्रीवादळाच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.