भुवनेश्वर | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने ‘तितली’ या चक्रीवादळाचे भयानक असे रुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ १६५ किलोमीटर प्रतितास वेगाने किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळात दोघांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH: Early morning visuals of #TitliCyclone making landfall in Srikakulam's Vajrapu Kotturu. #AndhraPradesh pic.twitter.com/x7H4yoF7ez
— ANI (@ANI) October 11, 2018
#TitliCyclone moving at a speed of 140-150 km per hour. Odisha's Gopalpur reported 102 km per hour and Andhra Pradesh's Kalingapatnam reported 56 km per hour surface wind speed
— ANI (@ANI) October 11, 2018
तितली हे चक्रीवादळ ओडिशातील गोपालपूरमध्ये दाखल झाले असून या ठिकाणीची अनेक झाडे कोसळली आणि विजेचे खांब पडेल आहेत. ओडिशामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. या प्रशासनाने आतापर्यंत ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आले आहेत.
#Visuals from Ganjam's Gopalpur after #TitliCyclone made landfall in the region at 5:30 am today. 10,000 people from low lying areas had been evacuated to govt shelters till last night. #Odisha pic.twitter.com/HEYog0DNe7
— ANI (@ANI) October 11, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.