HW News Marathi
देश / विदेश

Breaking News : तिहेरी तलाक विधेयक मंजूर

मुंबई | लोकसभेत आज तिहेरी तलाकवर चर्चा सुरू होती. हे विधेयक संयुक्त निवड समितीला पाठवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी केली होती. तर अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या विधेयकावरील सरकारची बाजू स्पष्ट केली होती. हा देश शरियतवर नाही, तर संविधानावर चालतो, असे नक्वींनी म्हटले होते.

बाल विवाहापासून सती प्रथा संपुष्टात आणण्यासही काहींनी विरोध केला होता. मात्र समाजाने या प्रथांना मूठमाती दिली, अशा शब्दांमध्ये त्यांनी तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. अखेर तिहेरी तलाकचे बिल लोकसभेत पास करण्यात आले आहे.

आज सभागृहात उपस्थित असलेल्या २४५ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. उपस्थितांपैकी ११ सदस्यांनी विरोधात मत नोंदविले. या विधेयकात एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तीन सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र या तिन्ही सुधारणा मंजूर होऊ शकलेल्या नाहीत. यासोबतच आणखी अनेक सुधारणा देखील मंजूर झालेल्या नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

News Desk

जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं, ‘व्यासपीठ तर भाग्यवानांचे कोसळतात,’ टिकैत यांची प्रतिक्रिया

News Desk