HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर

नवी दिल्ली | लोकसभेत आता तिसऱ्यांदा गुरुवारी (२५ जुलै) तिहेरी तलाक विधेयक मांडण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आपल्या खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. यापूर्वी २१ जून रोजी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत तिहेरी तलाक विधेयक मांडले होते. मात्र, विरोधकांनी या विधेयकावरून संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी देखील या विधेयकास जोरदार विरोध दर्शविला होता. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी वॉकआऊट देखील केले होते.

“तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लिमांच्या हक्काचे संरक्षण केले जाईल. या महिलांना न्याय मिळून त्यांचे सशक्तीकरण होईल”, असे मत रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वी व्यक्त केले होते. मात्र, “हे तिहेरी तलाक विधेयक मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे जतन करण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी नसून मुस्लिम पुरुषांना शिक्षा देण्यासाठी आहे”, असा आरोप करत यापूर्वी सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या या तिहेरी तलाक विधेयकाला स्पष्ट विरोध केला होता. दरम्यान, लोकसभेत हे विधेयक पास झाले असले तरीही विरोधकांनी सुचवलेले बदलांचा विधेयकात समावेश करून या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार दिल्लीत पोहोचले, पवार आणि राजनाथ सिंह यांची भेट

News Desk

बस दरीत कोसळून 30 ठार

News Desk

२४ तासांत देशात १०३५ नवे कोरोनाबाधित, देशाचा आकडा ७४४७ वर

News Desk