तिरुवनंतपुरम | सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच देसाईंना विरोध करण्यासाठी केरळमधील नागरिकही विमानतळाबाहेर दाखल झाले आहेत. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच केरळ पोलिसांनी थांबावे लागले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.
Kochi: Trupti Desai, founder of Bhumata Brigade, having breakfast at Cochin International Airport as she hasn't been able to leave the airport yet due to protests being carried out against her visit to #Sabarimala Temple. #Kerala pic.twitter.com/ILDV7silTx
— ANI (@ANI) November 16, 2018
केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिर शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. सबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा या सर्वोच्च न्यायायलयाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यामुळे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी येत्या शनिवारी (१७ नोव्हेंबर) मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्धार केला आहे.
Kochi: Trupti Desai, founder of Bhumata Brigade, at Cochin International Airport. Protests are underway outside the airport against her visit to #SabarimalaTemple. #Kerala pic.twitter.com/T3y1JEj8ZH
— ANI (@ANI) November 16, 2018
अयप्पा मंदिरात जाण्यासाठी सात महिला तयारीत असल्या तरी त्यांना कोणतेही विशेष संरक्षण देण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केरळमध्ये गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणता तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे निर्णयाची पाठराखण करणारे सरकार व विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने प्रवेशाचा सबरीमाला बंदीरावर अद्याप तोडगा निघाला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.